बाबासाहेबांनी या देशाला Equlity, Liberty, Feternity आणि Secular या तत्वांची ओळख राज्यघटनेच्या माध्यमातून करून देण्याचा प्रयत्न केला पण ते त्यावरच थांबले नाही तर त्यांनी या देशातील गोरगरीब जनेतेला शिका, संघटीत, व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र दिला. आज हि तत्व, हा मंत्र गायब झाल्यास्रखा वाटायला लागलंय.
पुरोगामी समजल्या महाराष्ट्रात आता पासूनचा निवडणुकीचे वारे वाहू लागलेत. आता या युतीची चर्चा करण्या अगोदर आपण याची पार्श्वभूमी बघितली पाहिजे. एका बाजूला गेल्या काही वर्ष पासून सेनेला लागेली घर घर तसेच राज ठाकरेंची वाढलेली
लोकप्रियता यामुळे मराठी तरुणांचा होणार आकर्षण त्याने सेना ग्रासली होती. त्यातच सेनेला बीजेपी सारख्या पक्ष आता कडून जास्त अपेक्षा ठेवता येत नव्हत्या तर दुसऱ्याबाजूला Republican party ऐक्य असूनहि काही फायदा होत नव्हता. रामदास आठवलेंना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी कडून मानहानी लाचारासारखा जिन मिळाल याला आठवले जवाबदार आहे.रामदास आठवलेंची शिर्डी मतदारसंघाचा निवडणुकीचा वेळी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी कडून जाणीवपूर्वक केलेला गुप्त प्रचार केला कि तुम्हाला निळ हवी कि गुलाल यामुळे आठवले निवडणुकीत पडले. हा झालेला दगा फटका जिव्हारी लागला होता. याचा बदला घेण्यासाठी या युतीचा चांगला फायदा होऊ शकतो तसच गेली दोन दशकात पक्षाचे कार्यकर्ते फक्त कार्यकर्तेचे राहिले होते त्यांना सत्तेत सामावून घेण्यात आले नव्हते. या सगळ्या आशेने सेना आणि आर पी आय कार्यकर्ते या युतीकडे बघतायत.
या युतीसाठी निमितही मार्मिक होतं कि सेनाप्रमुखांचा नुकत्याच शेजारी राहावयास गेलेले REPUBLICAN नेते रामदास आठवले यांनी सेनाप्रमुख बाळ ठाकरे यांचा वाढदिवसा दिवशी त्यांना शुभेछा देण्यासाठी गेले. या वेळेस ठाकरेंना आठवलेंना जयभीम घालावं कि राम राम म्हाणावा अशा कोड्यात सापड्लेलेया ठाकरेंनी selfish का होईना जयभीम म्हणत शिवशक्ती आणि भीमशक्ती यांनी एकत्र यावा म्हणून आठवलेंना साद घातली. पण भीमशक्ती आणि शिवशक्ती असा उलेख करण टाळल.तसं बगितल तर हि खूप साधी गोष्ट आहे पण आम्ही तुमचा पेक्षा वरचढ आहोत हेच यातून दाखून द्याच होत हे विसरून चालणार नाही.त्यावर “आठवले तुम्ही एकटेच या जास्त पोर संभालाण्याचा माझा स्वभाव नाही”असं ठणकावलं नाही नाही सांगितलं.
या भेटी नंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाची गणित बदलू लागली आज पर्यंत कॉंग्रेस राष्ट्रवादी यांचा बाजूला बसणारे आठवले आज उद्धव ठकारे आणि मनोहर जोशी याचा बाजूला दिसले. प्रिंट मिडिया आणि इलेक्ट्रोनिक मिडियाने याचा कीस पडत घेतला. काही बाजूचे तर काही विरोधाचे लिखाण छापुन येऊ लागले.वाहिन्यावर चर्चा घडू लागल्या, अंदाज आणि तर्कचे पेव फुटू लागले. युवकांसोबत चर्चा घडू लागल्या त्याहि सोयीचा जेवढा घ्याचा असाच बंधू लागले.तर नेटवर online चर्चा घडू लागल्या. सुरवातीला आपण सेनेचा इतिहास बघू आणि नंतर Republicanपक्षाचा इतिहास बघू
मुळात सेनेचा उदय का झाला हे बघितलं पाहिजे मराठी माणसाच्या प्रश्नावर उभी राहिलेली सेना हि गिरणगावात पसरू लागली त्यवेळी गिरणगावात communist चळवळीच मोठ प्रस्थ होत. कॉ कृष्ण देसाई नावाचा वाघ या गिरणगावात होता त्याला शह कसा द्याच याचा विचार कॉंग्रेस करत होत. त्याच कारण अस कि त्यावेळेस कॉ कृष्ण देसाई यांनी कॉंग्रेसला विधान सभेत वेठीस आणल होतं गिरणगावातल्या communistanच वर्चस्व कमी करायचा असेल तर सेनेला जन्माला घालन आवश्यक होता म्हणून मग महाराष्ट्रचे त्यावेळचे मुख्यमंत्री वसंत नाईकांचा पाठींब्यावर शिवसेना उभी राहिली. त्यावेळेस सेनेला “वसंत सेना” म्हणून प्रसिद्ध होती. परेल, लालबाग या गिरण्यांनी व्यपलेला भागात सेनेच प्रस्थ वाढू लागल. १९८० दशकात हळू हळू सेनेने आपला मराठी माणसाचा stand बदलला आणि मग हिंदुत्वाचा मुद्यावर काम करू लागली. गर्व से कहो हम हिंदूहैं,हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व सारख्या पाट्या सेनेच्या शाखावार दिसू लागल्या. १९९२ साली रामशक्ती सोबत अयोध्येतली बाबरी मशीद पडली. मुंबईत दंगली करून हजारो लोकांचे बळी घेतले. गोध्र हत्याकांडाचे आरोपी असलेली गुजरातच्या नरेंद्र मोदीची त्यांचा दोस्ताना आहे.रक्ताने बरबटलेल्या लोकांशी युती कशी करता येईल.
Republican पक्षाचा इतिहास बघन गरजेच आहे बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिरवानानंतर जवळ पास दहा महिन्यांनी ३ अक्टोबर १९५७ ला रेपुब्लीकॅन पक्षाची स्थापणा झाली. १९५७ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाचे १९ आमदार होते परंतु आणि त्यानंतर एकाच वर्षनि म्हणजे तीन अक्टोबर १९५८ ला या पक्षात फुट पडली .एक पक्ष बी सी कांबळे यांची नेतृत्वाखाली दुरस्त Republican पक्ष म्हणून महाराष्ट्रातच्या राजकारणात वावरू लागला. तर दुसरा ना दुरस्त म्हणून आपलं अस्तित्व टिकून होता. त्यावेळ्स कॉंग्रेस पक्षाचा नेत्यांच्या राजकीय डावपेचा भाग म्हणून किवा दलित नेत्यांनी वयकातिक विकासाच्या लाभपायी संघर्ष्याच्या एवजी सहकार्यच नावाखाली तडजोडी सुरु केल्या. अनेक Republican पक्षाचे नेते कॉंग्रेस प्रवेश करून सत्ताआरूढ झाले होते. तर काहींनी निवडणुकीच्यावेळी करार केले होते. कालांतराने कॉंग्रेस पक्ष कडून काहीच मिळत नाही याची खात्री झाल्या नंतर हेच नेते विरोधी पक्षIच्या आघाडीत सामील झाले होते. बाबासाहेब मुले जो दबदबा निर्माण झाला होता तो नष्ट झाला आणि दलित अत्याचाराच्या घटनां मध्ये वाढ होऊ लागली ('आंबेडकर आणि मार्क्स' - रावसाहेब कसबे पान क्र १३९ ते १४० ).
सत्तरच्या दशकात दलित पँथर च्या माध्यमातून दलित तरूणांच म्हणने समोर आलं त्यांचा revolt समोर आलं. दलितपँथर हि व्यापक विचार सरणीवर उभी राहत असल्यामुळे जातीय वर्गीय भूमिका सुवीकारणे कर्म प्रत होता. पंथरच्या या भूमिकामुळे जातीय किलाल्ना सुरुग लागू लागल.खरे तर दलितांचे शत्रू कोण? मित्र कोण? दलित कोणाला म्हनायचं? अशा संकल्पना दलित पंथर जाहिरानामामुळे सर्व सामन्य माणसापर्यंत पोहोचल्या. सत्तादरी म्हणजे काय? त्याच जनताविरोधी काराभारला विरोध करणारे विरोधी पक्ष म्हणजे काय या राजकारणात दलित हिताचे राजकारण कोणते आहे हे या जाहिरानामात होते. अशा दलितपंथेर बरोबर सेनेचे नेहमीच खटके उडू लागले होते.उदाहरण द्द्यायचं झाल तर वरळीच्या दंगलीचा वेळेस सेनाप्रमुखाकानी नर्दुला टंक मैदानवर केलेलं भाषण आठवावा लागेल त्या वेळी ते मानतात कि “मराठी माणसात फुट पडायचे प्रकार शिवसेना खपून घेणार नाही.पंथेरला मी बजावतो, कि त्यांनी त्यांचा धर्माचा प्रचार खुशाल करावा पण हिंदू देव देवतान विषये काही बोलला तर याद राख तुम्ही चिते असला पण आम्ही वाघ आहोत वेळ आली तर हा वाघ चीत्याचा घास घेतल्याशिवाय राहणार नाही” {“कोंडमारा”अनिल अवचट पान क्र ५६}
या शिवशक्ती आणि रामाश्कती या युतीचा सरकार महाराष्ट्रात सत्तेवर आल तेव्हा मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नामांतर दंगलीच्या वेळी Artocity Act अंतर्गत दाखल करण्यात आलेली ११०० खटले कडून टाकण्यचा भाषा केली होती. तसच ११ जुलै १९९७ घाटकोपर येथील रमाबाई कॉलोनीत मध्ये गोळीबार करून ११ दलितांचे बळी घेतले. त्याच वेळी दलित तरुण हे tanker जाळायला निघाले होते अशी tanker theory मांडण्यात आली. त्याच शक्तीशी आज आठवले युती करायाल निघाले.गोध्र हत्याकांडाचे आरोपी असलेली गुजरातच्या नरेंद्र मोदीची त्यांचा दोस्ताना आता तर आठवलेहि मोदींना भेटून आले, फोटोही काढले तर फोटो प्रसिद्धही केले याला तुम्ही काय म्हणाल
आजही दलितांवर अत्याचर होताना दिसतात भंडारा जिल्यतल खैरलांजी गावात भोतमांगे कुटुंबाची निर्घुण केलेली हत्या तसच मुंबईतील दारूखान विभागात दलित मुलीची नग्न धिंड काढण हे आजही सुरु आहेत. याची साधी बातमीही सेनेचा सामना या वर्तमान पत्रात येत नाही. आली तरही कुठ तरी एका collum मधे असते. मग ह्या युतीमुळे हे अत्याचार थांबणार आहेत काय? दलितांचा सामाजिक न्याय संदर्भात कोणती भूमिका सेना घेतेय. दलितान मध्ये असलेली जाणीव मोडून काढण्याचा प्रयतन या निमिताने होतोय कुठला समान कार्यकर्म आठवलेंना दिसला.हे कळतच नाही.आज रामदास आठवले सेनेचे प्रवक्ता सारखे बोलतायत.महाराष्ट्र ठिकठिकाणी युतीसाठी मेळावे होतायत.या मेळावाना किती सेनेचे आणि भाजपचे नेते उपस्थित होते हे आपण सगळ्यांनी पहिले आहे.सेनेचा वर्धापन दिनी सेनेचे कार्यध्यक्ष उध्दव ठाकरे म्हणाले कि आठवले तुम्हाला मनाचे ताट देण्यात येईल. आता हे मनाचा ताट बघण्याची वेळ आली आहे. नाही तर संगतीला एक आणि पंगतीला एक अस होयचा.या युतीतला तिसरा पक्ष वा शक्ती { रामशक्ती} अजून लांब लांब आहे. तस त्यांनी म्हणजे नितीन गडकरींनी आठवलेंना NDA सामील होयला सांगितलं.
तर या युतीचा नगरा ज्या वेळेस वाजला त्या वेळेस कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष मध्ये भीतीच वातावरण झाल.त्यातच राष्ट्रवादी पक्षांचा अजित पवारांनी दादर स्टेशनला चैत्यभूमी याचं नाव देण्याची घोषणा करून एकूणच गोंधळं मजवाण्याचा प्रयत्न केला व तसा ठराव राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिनच औचित साधून सामाजिक परिषदे मध्ये संमत करून घेतला.तर कॉंग्रेसने डॉ बाबासाहेब आंबेडकर याचं नाव दादर स्टेशनला द्यावं म्हणून पंतप्रधानान पत्र पाठवलं. कुणी मतासाठी तर कुणी खुर्चीसाठी बाबासाहेबंचा विचार नेहमीच विकत आलेत.या सगळ्यातून भीमशक्ती - शिवश्कातीचा टायर puncture करण्यचा प्रयत्न केला. एकीकडे कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडी जी पुरोगामितेच भांडवल करून, धर्मनीरपेकशेतेचा आव आणून नेहमीच एका वर्गाचा हित जोपासण्यात आपली सारी शक्ती घालवली आहे. त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे.
वीस वर्ष आठवले कॉंग्रेस सोबत होते त्यांनाकशा प्रकारची वागणूक मिळत होत आपण जनता आहात. शरद पवारांनी बेरजेचा राजकारण करून आठवलेंना आपल्या गोट्यात आणल आणि आंबेडकरी चळवळीला तोडन्यचा प्रयत्न केला त्यात ते यशश्वी झाले.तस पवारांनी हे गणित सोडवान्यचा शिक्षण त्याचा मानस पित्या कडून घेतलं आहे.कारण त्यांनीही Republicanपक्ष फोडला आणि यांनीही १९९२ साली पक्ष फोडला पण हे सगळ लक्षात यायला आठवलेंना वीस वर्ष जावी लागली. आता सगळे आठवलेवर टीका करू लागले.काहींनी जुने संदर्भ दिले.ज्याना या युती मध्ये समावता आल नाही ते ओरड करू लागले कि आंबेडकरी चळवळ निघाली कुठे? किवा पत्रकार परिषद घेऊन आठवले कसे चुकीचे आहेत हे सांगू लागलेत इतकीच आंबेडकरी चळवळची काळजी होती दलित अत्याचारच्या घटना घडतात त्या वेळीस कुठे असता . त्यावेळी ह्या सगळ्या नेत्यांनी का आवाज उठवला नाही.काम झाल कि विसरयाचा हि जुनी रीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आहे. आज सेना आणि भाजप हे देखील तसे वागणार नाही याची खात्री देऊ शकत नाही.सेना भाजप यांचा अगेंडा वर जात वर्ग अंताचा कोणता कार्यक्रम आहे. भूमिहीन शेत मजूर आणि असंघटीत कामगारांसाठी कोणत्या योजना आहेत.हिंदुत्व भोवती ह्याच राजकारण फिरत आज मागासवर्गीय studentचा feeचा, scholarshipचा प्रश्न आहे. हे सगळे युतीचा अजेंड्यावर आहे का तर नाही. मग कोणत्या आधारावर हि युती होतेय.
एकीकृत Republican पक्षाने डावी आघाडी, पुरोगामी पक्ष {रीडोलास} निवडणुकीला समोर गेला परंतु त्या यश आल नाही का तर आजकाल निवडणुका ह्या विचारांचा जोरावर नाही तर नोटवर लढल्या जातात हेच दिसून आल, तसच हा प्रयोग निवडणुकीचा काही महिने अगोदर झाला होता. लोकांमध्ये त्याची रीतसर चर्चाही झाली नव्हती.
आज पुन्हा एकदा आशा युतीची गरज आहे,कि जी फक्त निवडणुका डोळ्या समोर ठेऊन राजकारण् करण्या ऐवजी त्यांनी दलित अन्याय अत्यचार विरुद्ध न्याय मिळून देण्यासाठीच राजकारण करेल.मग संसदीय निवडणुका जिंकता येईल. आज आंबेडकरी चळवळ आणि महाराष्ट्रातली साम्यवादी आणि पुरोगामी चळवळ एकत्र येऊन देशाच्या राजकारणात सहभागी झाल्या पाहिजेत. तरच येणाऱ्या काळात गोरगरिबांचा सरकार येईल.लोकांच्या दुष्मनला ओळखा.सत्ताधरायांच्या {आघाडीची असो वा युतीची असो} हातातले बाहुले बनण्यापेक्षा समाजहिताचे राजकारण करा आणि बदलत्या परिस्थीच शांतपने विचार करा.नाही. तर काळ यांना माफ करणार नाही.
अजित अभिमेषी
संशोधक
No comments:
Post a Comment